लग्नसोहळा

लग्न हि देवाने दिलेली भेट आहे, आणि आम्ही लग्नातील सेवांचा दर्जा हि आमच्याकडून देवाला केलेले समर्पण समजतो. चला तर ह्या सोहळ्याला रंगतदार बनवूया !!!! इथे प्रत्येक वर-वधू ने पाहिलेले लग्नाचे स्वप्न पूर्ण होते. आपल्या जोडीदारासह आणि जवळच्या आप्तस्वकीयांसोबत आपल्या नव्या आयुष्याची अत्यंत आनंदायी जीवनाची सुरुवात आपण जेव्हा जयमाला गार्डनच्या निसर्गरम्य परिसरात कराल तेव्हा तो आनंदाचा क्षण चिरकाल होईल.

आमच्या येथे आयोजित केले जाऊ शकणारे कार्यक्रम:

  • साखरपुडा: सहजीवनाच्या गाठी बांधण्यासाठी म्हटले तर हि तोंड ओळख, मात्र आम्ही हे देखील अविस्मरणीय करू शकतो.
  • संगीत: आमच्या येथे मेहेंदी, श्रीमंतपूजन इत्यादी कोणत्याही लग्नपूर्व कार्यक्रमांचे नियोजन करू शकतो, तसेच संगीत सारख्या नव्याने समाविष्ट होत असलेल्या समारंभांसाठी देखील हे आदर्श स्थान आहे.
  • स्वागत समारंभ: भव्य रिसेप्शन साठी उत्कृष्ट व्यवस्था आणि विपुल परिसर उपलब्ध आहे.