आम्हाला का निवडाल?

यमाला गार्डन

जयमाला गार्डन हे एक डेस्टिनेशन वेडिंगसाठीचे सर्वोत्तम ठिकाण आहे !!!

जयमाला गार्डन आपण स्वप्नात कल्पना केलेल्या अशा प्रसंगांना एकमेवाद्वितिय शैलीत वास्तवात आणण्याची जबाबदारी आम्ही घेतो. कोणताही समारंभ असो त्यासाठी आम्ही तत्परतेने तयार आहोत. तुमच्या कल्पनेनुसार तुमच्या विवाहाचा दिवस सजवला जाईल आणि तो अविस्मरणीय ठरवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, हे सुवर्णक्षण तुमच्या मनात आयुष्यभर रुंजी घालतील. आम्ही आमच्या कामाबद्दल तत्पर आहोत आणि तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची खात्री देतो. आमच्या येथे पारंपारिकतेसह आधुनिकतेचि सांगड घालीत एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन करणे, रचना करणे आणि त्याचे कार्यान्वयन करण्यासाठी एक व्यावसायिक दृष्टिकोन बाळगतो. आमचे ग्राहक आमचे मित्रच नव्हे तर आमचा बृहदपरिवार आहेत आणि म्हणूनच त्यांच्या इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी आमच्या ग्राहकांना वैयक्तिकरित्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.

जयमाला गार्डन आधुनिक सुविधा युक्त आणि मनमोहक कार्यक्रम प्रदान करण्यासाठी आश्वासित करते. व्यापारमेळा, खाद्य महोत्सव असे कार्यक्रम येथे यशस्वीपणे राबवले गेले आहेत. आम्ही व्यवसायविषयक नैतिकतेचे पालन करण्यास तत्पर आहोत. आमचा चमू तुम्हाला सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहील. आणि हेच आमच्या आजवरच्या यशाचे गमक आहे. त्याचमुळे आपण निर्वेधपणे आमच्या सेवेचा आनंद घेऊ शकता .

तुमचा कुठलाही सोहळा परिपूर्ण होण्यासाठी जयमाला गार्डन परिवार कटिबद्ध आहे. जयमाला गार्डन सुमारे २००० लोकांना सामावून घेऊ शकणारे पुरेसे निसर्गरम्य आणि सुसज्ज असे ठिकाण आहे.

दिवस व रात्रीच्या समारंभांसाठी योग्य स्थान

आम्ही दिवसाच्या कोणत्याही प्रहारासाठी उत्कृष्ट संकल्पना सुचवतो. याचमुळे आपल्याला कोणताही कार्यक्रम संपन्न करण्यासाठी अडचण येत नाही. कार्यक्रम दिवसाचा असो अथवा सायंकाळचा आमच्या येथे आपल्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेता येण्याजोगे असे पर्याय आम्ही निवडण्यासाठी ठेवले आहेत.

पॅकेजेस

बजेटची अडचण? आपल्या बजेट पासून राजेशाही थाटाच्या सोहळ्या पर्यंत प्रत्येक उत्पन्नगटास परवडणारी तरीही वेगळेपण जपणारी पॅकेजेस हे आमचे वैशिष्ठ्य आहे.
about-us-spa